अनुक्रमणिका *फॅशन कोण ठरवतं? *नऊवारी *फॅशन विश्वातील करिअर खुणावतेय *मेन इन पिंक *'टाइमली' फॅशन *मराठी कॅलिग्राफीतील ‘टी-शर्ट’ *स्टायलिश जॅकेटस् |
फॅशन कोण ठरवतं?
ही चालू फॅशन आहे, असं आपण सहज बोलून जातो.
हा ना... सध्याचा ट्रेण्ड आहे, असं सांगत असतो. अचानक स्टोल वापरणाऱ्या मुली आपल्या आजुबाजूला दिसायला लागतात. किंवा मुलांमध्ये अचानक लो वेस्ट जीन्स किंवा चेक्स शर्ट्सची फॅशन आल्याचं दिसतं. हे सगळे ट्रेण्ड नेमके येतात कुठून हे समजणं जरा अवघड असतं. पण ही लागण एखाद्या साथीच्या आजाराप्रमाणे अचानक फैलावते. नवी फॅशन आल्यावर आधीच्या फॅशनचं नामोनिशान उरत नाही. पण ही फॅशन प्रत्येक स्टेट्समध्ये फॉलो केली जाते.
परदेशात फॅशनचा ट्रेण्ड ठरतो तो तिथल्या फॅशन शो-कलेक्शनमधून. कोणते रंग या सिझनमध्ये चालणार आहेत. कोणते कट अॅण्ड फॉल्स (ही झाली फॅशनची भाषा) यावेळी 'इन' असणार आणि कोणते रंग 'आउट' असणार आहेत, हे सगळं ठरवतात, ते तिथले फॅशन वीक. तिथले टॉपमोस्ट डिझायनर या सिझनमध्ये हे रंग चालणार आहेत, हे डिझायन्स फॉलो करा, असं सांगत असतात. आणि तिथलं फॅशन माकेर्टही या डिझायनर्सचे चॉइसनुसार कपडे आणत असतात.
आपल्याकडे चित्र दिसतं ते नेमकं उलटं. आपले डिझायनर जे सांगत असतात त्याच्या नेमकी विरोधी ट्रेण्ड आपल्याकडची आम जनता फॉलो करत असते. फॅशन डिझायनर फॅशन वीकमध्ये आपलं कलेक्शन सादर करतात. त्यातून यंदाच्या सिझनमध्ये नेमके कोणते रंग वापरावेत. कोणत्या डिझायन्स प्रिफर कराव्यात, याचा अंदाज देत असतात. पण होतं काय की, या फॅशनडिझायनर्स आपल्या डिझायन्समधून जो ट्रेण्ड अपेक्षित असतो, तो लोकांपर्यत अनेकदा पोहोचतंच नाही. शिवाय आपल्याकडे बॉलिवूडचे स्टार्स जी फॅशन करतात, तीच लोकांना जास्त जवळची वाटते. किंवा अलीकडे तर सिरीअलमधल्या कलाकारांची फॅशन घराघरात दिसू लागली आहे. भरजरी साड्या, गडद आणि झुळझुळीत शिफॉनच्या साड्यांची चलती आली ती सिरीअलमधल्या तमाम सास-बहूंकडून. अगदी दागिन्यांची आवडही बदलली आहे. पण फॅशन वीकमधले ट्रेण्ड्स आणि सध्याची फॅशन यात अजिबातच काही साम्य नसतं. त्यामुळेच सध्याची फॅशन कोणते आणि त्यातले ट्रेण्ड्स काय असं जर कोणी विचारलं तर मात्र डिझायनर्समध्येही एकमत नसेल हे नक्की. तर आपण नेमकं काय करायचं याविषयीच्या गोंधळातून फॅशनच्या नावाखाली भलतंच काही तरी केलं जाण्याची शक्यता असते.
......
फॅशन विश्वातील करिअर खुणावतेय
फॅशनची दुनिया काही औरच आहे. नवनवीन ड्रेसेस, डिझाईनर साडी, दागिने, चप्पल व शूज, पर्स आणि आणखी किती तरी. भारतातील फॅशन डिझाईनर्सनी तर जागतिक यश प्राप्त केले आहे. रितू कुमार, राघवेंद्र राठौर, रोहित बाल, रितू बेरी, रोहित गांधी, राहुल खन्ना, शंतनू आणि निखिल असे किती तरी फॅशन डिझाईनर्स आहेत ज्यांनी जागतिक कीर्ती प्राप्त केली आहे.
भारतातील वस्त्रनिर्मितीचा व्यवसाय प्रचंड प्रमाणात विस्तारत आहे. २००९ मध्ये ७६.३ मिलीयन डॉलर्स एवढी निर्यात भारतातील उद्योगांनी केली आहे. भारतातील वस्त्र आणि कॉटन उद्योगाचा जीडीपीमध्ये ४ टक्के वाटा आहे. एकूण उत्पादन क्षेत्रापैकी १४ टक्के वाटा वस्त्र उत्पादनाने काबीज केला आहे. फॅशन टेक्नॉलॉजी आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग (वस्त्र निर्मिती) मध्ये एकूण ३५ दशलक्ष मनुष्यबळ प्रत्यक्ष काम करीत असून अप्रत्यक्ष ५४.८६ मिलीयन मनुष्यबळ या उद्योगात कार्यरत आहे. म्हणजे एकूण ८९.८६ मिलीयन मनुष्य असणारी ही फॅशनची दुनिया आहे. भारतातील जेवढी वस्त्र निर्मिती होते त्यापैकी ६० टक्के माल हा यूएस, जपान, युरोपियन युनियन येथे निर्यात होतो. यावरूनच लक्षात येते की फॅशन टेक्नॉलॉजी आणि गारमेन्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये करिअरच्या मोठ्या संधी आहेत.
फॅशनच्या या दुनियेत उच्च दर्जाची फॅशन टारगेट बरोबरच रेडी टू वेअर, स्पोर्टस् वेअर,ऍक्सेसरिजमध्ये करिअर करिता संधी आहे. डिझाईन ऍण्ड टेक्नॉलॉजी, लेदर ऍपीरिअल डिझाईन ऍण्ड टेक्नॉलॉजी, टेक्स्टाईल डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट, फॅशन कम्युनिकेशन इत्यादी नवीन क्षेत्र विस्तारत आहेत. फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये कमी ग्राहक संख्या असलेल्या फॅशनच्या वर्गाबरोबरच होलसेल आणि इतर ग्राहकांसाठी वस्त्र व इतर फॅशन ऍक्सेसरीजची मागणी आहे. त्यामुळे फॅशन डिझायनिंग,आणि गारमेंट्स बनविण्याच्या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी आहेत.
फॅशन टेक्नॉलॉजी ः विशेष करिअर क्षेत्रफॅशन डिझाईन हे सातत्याने वेगवेगळे डिझाईन्स आणि नावीन्यपूर्ण वस्त्र, ऍक्सेसरीज्कडे केंद्रीत असते. हे सर्व करीत असताना व्यवसायिकता आणि उपयोगितता यावर साहजिकच भर असतो.
फॅशन (वस्त्र व ऍक्सेसरीज्) डिझाईन, उत्पादन, विक्री कला, व्यवसायकला, फॅशन प्रमोट करण्याची कला अशा विविध क्षेत्रातील संधी यावरून फॅशन दुनियेतील विविधता लक्षात येते.
फॅशन दुनियेतील करिअर कसे असते?फॅशन डिझाईनिंगमध्ये विविध शाखांमध्ये करिअर आहे. विविध समारंभांसाठी वस्त्रांची निर्मिती, विविध मटेरिअल (उदा. लेसर, नीटवेअर) पासून वस्त्र निर्मिती असे क्षेत्र असतात. काही डिझाईनर्स ऍक्सेसरीज् जसे की दागिने, वेस्ट, पर्स, डाईज इत्यादी क्षेत्रामध्ये करिअर करीत असतात. नामवंत अशा विविध ब्रॅंडसाठी काही डिझाईनर्स हे नवीन स्टाईल्स आणि नवीन प्रॉडक्ट्स डिझाईन करीत असतात. फॅशन डिझाईन बरोबरच गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग अशा विविध क्षेत्रामध्ये करिअर असते. आपला स्वतःचा व्यवसाय
(Boutiq), डिझाईनर्स तसेच मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग मध्ये नोकरी, होलसेल, रिटेल व्यवसाय, अशा प्रकारचे व्यवसाय, स्वयंरोजगार शिक्षण प्राप्त केल्यानंतर करता येतात.
क्षमता व कौशल्य
Creativity & Innovation हा फॅशन दुनियेतील अग्रेसर क्षमता होय. Visual Expression बरोबरच Drawing, Cutting, Making, Exploring Colour & textile संशोधन वृत्ती, उत्कृष्ट संवाद कौशल्य इत्यादीची आवश्यकता आहे. उत्पादन क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाची आवड, व्यवसायिकता असणे आवश्यक आहे.
फॅशन डिझायनिंग, टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम
ड्रेस डिझायनिंग, टेक्नॉलॉजी ऍण्ड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग, जिमॉलॉजी ऍण्ड ज्वेलरी डिझाईन, ग्राफीक डिझाईनर, लेदर ऍण्ड फूट वेअर अशा विविध अभ्यासक्रमाची उपलब्धता महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर आहे. एक वर्ष ते तीन वर्षे कालावधीचे विविध अभ्यासक्रम असतात. फॅशनची दृष्टी, कल्पकता आणि नावीन्यता, ड्रॉईंग आणि कलर, टेक्स्टाईल आणि टेक्चर, स्टाईल अशा विविध क्षमता आणि आवड असणाऱ्यांना या क्षेत्रात शिक्षण घेऊन करिअर करता येऊ शकते. काही अभ्यासक्रमांना इयत्ता १० वी मध्ये ५० टक्के गुण खुला वर्ग आणि ४५ टक्के गुण मागासवर्गीयांकरिता प्रवेश पात्रता आहे, तर काही अभ्यासक्रम इयत्ता १२ वी, पदवीनंतर उपलब्ध आहेत.
कोठे करता येईल?इयत्ता १० वी नंतर महाराष्ट्रातील विविध तंत्रनिकेतन (Polytechnic) मध्ये तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम ड्रेस डिझायनिंग ऍण्ड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग या नावाने उपलब्ध आहे. शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद, लातूर, पुणे, यवतमाळ येथे तर नाशिक, पुणे, नागपूर, मुंबई येथे विविध संस्थांमध्ये उपलब्ध आहे. स्केचिंग, ड्रॉईंग, कटिंग, पॅटर्न मेकिंग, ग्रेडिंग, फॅब्रिक सायन्स, फॅशन डिझायनिंग, स्वीईंग, कॉम्प्युटर एडेड डिझायनिंग, मशीन, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, ऍपीरीयल ऍण्ड ऍक्सेसेरीज डिझाईन, मार्केटिंग इंटरप्रेनियरशिप असे विविध विषय या तीन वर्षे पदविका अभ्यासक्रमामध्ये शिकवले जातात. ६० टक्के अभ्यासक्रम प्रात्यक्षिकावर आधारित असतो. अंतिम वर्षामध्ये प्रोजेक्ट वर्कमध्ये विद्यार्थ्यांना सर्व क्षमता व कौशल्यांचा वापर करण्याची सुविधा आहे.
तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय (फॅशन डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नोकरी, रिटेल, होलसेल व्यवसाय करता येतो. पदविका पूर्ण केल्यानंतर तीन वर्षे पदवी करण्याची संधी उपलब्ध आहे.
ii) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (नवी दिल्ली, मुंबई, कोलकोता, चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, गांधीनगर, इत्यादी) या संस्थेमध्ये इयत्ता १२ वी नंतर फॅशन डिझायनिंग संबंधित विविध पदविका व पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी पुणे येथेदेखील अशा प्रकारचे अभ्यासक्रम राबविले जातात.
भर कशावर?फॅशन डिझायनिंगमध्ये नवीन कल्पना साकारण्यापासून ते फॅशन डिझायनिंग करण्यापर्यंत शिक्षण दिले जाते. पॅटर्न मेकिंग, गारमेंट कन्स्ट्रक्शन, ग्रेडिंग, फॅशन आर्ट, ऍपीटीअल फॅब्रिक ऍण्ड टेक्स्टाईल, प्रेझेन्टेशन टेक्निक, मार्केटिंग अशा विषयांवर भर दिलेला असतो. अभ्यासक्रम प्रात्यक्षिकावर जास्त प्रमाणात आधारलेला असतो.
ऍक्सेसेरीज डिझाईन या अभ्यासक्रमामध्ये डिझायनिंगचे मूलभूत शिक्षण, ड्राईंग, डिझायनिंग टेक्निक्स, कॉश्यूम ज्वेलरी इत्यादी विषयांचे ज्ञान दिले जाते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर फॅशन शो आयोजित करणे, डिस्प्ले (शो रूम) तयार करणे, मार्केटिंग करणे इत्यादी क्षेत्राकरिता काम करता येते. विविध संस्थांचे आणि डिझायनर्सचे फॅशन शो आणि फॅशन डिस्प्ले आयोजित करणे व मार्केटिंग करणे या क्षेत्रात आवश्यक कौशल्य व क्षमता अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत.
लेदर गारमेंट डिझायनिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमामध्ये लेदर गारमेंट डिझायनिंगचे विशेष ज्ञान दिले जाते. लेदर गारमेंट डिझायनिंग करणे आणि उत्पादन तयार करणे या तर अभ्यासक्रमाचा भर आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय लेदर डिझायनिंगचा अभ्यास, कल्पक डिझाईन तयार करणे, पॅटर्न मेकिंग आणि लेदर गारमेंट उत्पादन करण्याची पूर्ण प्रक्रिया आणि तंत्रज्ञान अशा विषयांचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये आहे.
नीटवेअर डिझाईन ऍण्ड टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात नीटवेअर डिझायनिंग आणि वस्त्र उत्पादन तंत्रज्ञानाबाबत शिक्षण दिले जाते. इतर फॅशन संबंधित अभ्यासक्रमाप्रमाणेच कल्पकता, मटेरिअल सायन्स, पॅटर्न मेकिंग, गारमेंट कन्स्ट्रक्शन, डिझायननिंग टेक्निक्स, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऍण्ड टेक्नॉलॉजी या विषयांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव आहे. ऍपेरिअल मार्केटिंग ऍण्ड मर्चेनडायझींग या अभ्यासक्रमामध्ये मार्केटिंग व उद्योगासंबंधित विविध सेवा याबाबत विषयांचा अंतर्भाव केलेला आहे. विक्री, जाहिरात, आंतरराष्ट्रीय मार्केटिंग, फॅशन को-ऑर्डीनेशन, कॉम्प्युटर ऍप्लीकेशन, मार्केट सर्व्हे ऍण्ड रिसर्च, रिटेल ट्रेड, स्टडी ऍण्ड कन्झ्युमर बीव्हेयीयर अशा विषयांचा आणि क्षमता विकासाचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे.
सारांश
सातत्याने वाढणाऱ्या फॅशन दुनियेत फॅशन डिझाईनर आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंगचे contribution खूप आहे. नुसतेच वस्त्रच नव्हे तर टाईज, शूज, चप्पल, पर्स, डिस्प्ले, दागिने अशा करितादेखील नवनवीन आणि कल्पक डिझाईन्स बाजारात पाहावयास मिळते. हे सर्व शक्य आहे ते फक्त फॅशन दुनियातील या अभ्यासक्रमामुळे. चला तर करा विचार फॅशन दुनियेचा!
......
मेन इन पिंक
गुलाबी रंगावर स्त्रियांची मक्तेदारी आणि निळ्यावर पुरुषांची! कारण गुलाबी रंग म्हणजे नाजुक नजाकतीचा म्हणून तो लहान बाळं आणि महिलांशी जोडला गेलाय. पण गेल्या काही वर्षांत फॅशन डिझायनर्सनी गुलाबी रंगाला पुरुषांच्या र्शट्सच्या माध्यमातून रॅम्पवर आणलं आणि पुरुषांमध्ये या रंगाची क्रेझ वाढू लागली. आपल्या लाइफस्टाइलबद्दल जागरूक झालेला आजचा मेट्रोसेक्शुअल मॅन आता गुलाबी कपड्यांमध्ये दिसू लागलाय...
पिंक' म्हणजे 'कलर ऑफ रोमान्स'! ज्या हृदयात प्रेम वसतं त्या हृदयाचा रंग लाल असतो. त्यातून व्यक्त होणाऱ्या प्रेमाची छटा फिकट होते म्हणून प्रेमाला गुलाबी रंगाच्या छटाची मान्यता मिळाली. मात्र गुलाबी रंग म्हणजे स्त्रियांचा रंग अशी मानसिकता पुरुषांमध्ये तयार होत गेली. अर्थात, हा आंतरराष्ट्रीय फंडा आहे. एखादा दुसरा अपवाद वगळता गुलाबी रंगात पुरुषांचे कपडे कधीच दिसायचे नाहीत. पण आता हे चित्र बदलतंय. अप टू डेट, स्मार्ट, कॅज्युअल, स्टायलिश असे अनेक पर्याय पुरुषांच्या कपड्यांमध्ये निर्माण झाले असून यात गुलाबी रंगाला उठाव येऊ लागलाय. फॅशन डिझायनर्सनी या रंगाला पुरुषांच्या कपड्यात आणून त्यांच्या वॉर्डरोबचा अविभाज्य भाग बनवून टाकलं. त्यात आधुनिक युगातल्या मेट्रोसेक्शुअल मॅनची मानसिकता वेगळी असल्याने गुलाबी रंगाचे कपडे त्यानेही पटकन आपलेसे केले. याचं श्रेय इण्टरनॅशनल ब्रॅण्ड्सना द्यायला हवं.
मुंबईसारख्या शहरात इण्टरनॅशनल ब्रॅण्ड्सचं प्रस्थ वाढू लागलंय आणि त्याबरोबर नव्या फॅशनचंही. याआधी
आपल्या इथल्या फॅशन डिझायनर्सनी गुलाबी रंगात पुरुषांचं कलेक्शन डिझाइन केलं होतं पण ठराविक रंगांचे शर्ट्स आणि पॅण्ट्स घालणाऱ्यांना ते पसंत पडलं नव्हतं. पुरुषांच्या कलेक्शनमध्ये आता मोठ्या प्रमाणात गुलाबी रंगाचा वापर होऊ लागलाय. गुलाबी रंगातल्या गडद-फिकट छटांमध्ये शर्ट्स, कुतेर्, झब्बे डिझाइन करण्यात फॅशन डिझायनर्सने पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच एकंदरच फॅशनच्या दुनियेत गुलाबी रंग सध्या रॉकिंग आहे. गुलाबी रंगांचा वापर असलेल्या मेन्स आउटफिट्सचा फॅशन शो नुकताच एका सप्ततारांकित हॉटेलमध्ये पार पडला. गुलाबी रंगाच्या कपड्यांना पुरुष वर्गाने पसंतीची पावती दिली असल्याचा प्रत्यय या फॅशन शोमध्ये आला. बॉलिवूडमधील अनेक स्टार यात सहभागी झाले होते. जी फॅशन रॅम्पवर येते ती माकेर्टमध्ये यायला आपल्याकडे वेळ लागत नाही. त्यात सैफ अली, हृतिक रोशनसारखे बॉलिवूड स्टार्स पिंक रंगाला प्राधान्य देऊ लागल्याने सर्वसामान्यांनाचीही आवड बदलायला लागलीय. पिंक रंग जरी गलिर्श वाटला तरी पुरुषांच्या स्टाइल्सनुसार डिझाइन करता येऊ शकतो, असं फॅशन डिझायनर्सचं म्हणणं आहे.
' पिंक इज अ क्लासिक कलर अॅण्ड वी लव टू वेअर इट' असं या स्टार मंडळींचं म्हणणं आहे. मात्र पिंक प्रिण्ट्सना फारशी पसंती नाहीये. प्लेन पिंक रंग पसंतीस उतरतोय. रॅम्प आणि शोरूम्समधून आता ही फॅशन लवकरच सर्वत्र पसरेल आणि 'मेन इन ब्लॅक' ऐवजी 'मेन इन पिंक' असं म्हणावं लागेल.
पिंक' म्हणजे 'कलर ऑफ रोमान्स'! ज्या हृदयात प्रेम वसतं त्या हृदयाचा रंग लाल असतो. त्यातून व्यक्त होणाऱ्या प्रेमाची छटा फिकट होते म्हणून प्रेमाला गुलाबी रंगाच्या छटाची मान्यता मिळाली. मात्र गुलाबी रंग म्हणजे स्त्रियांचा रंग अशी मानसिकता पुरुषांमध्ये तयार होत गेली. अर्थात, हा आंतरराष्ट्रीय फंडा आहे. एखादा दुसरा अपवाद वगळता गुलाबी रंगात पुरुषांचे कपडे कधीच दिसायचे नाहीत. पण आता हे चित्र बदलतंय. अप टू डेट, स्मार्ट, कॅज्युअल, स्टायलिश असे अनेक पर्याय पुरुषांच्या कपड्यांमध्ये निर्माण झाले असून यात गुलाबी रंगाला उठाव येऊ लागलाय. फॅशन डिझायनर्सनी या रंगाला पुरुषांच्या कपड्यात आणून त्यांच्या वॉर्डरोबचा अविभाज्य भाग बनवून टाकलं. त्यात आधुनिक युगातल्या मेट्रोसेक्शुअल मॅनची मानसिकता वेगळी असल्याने गुलाबी रंगाचे कपडे त्यानेही पटकन आपलेसे केले. याचं श्रेय इण्टरनॅशनल ब्रॅण्ड्सना द्यायला हवं.
मुंबईसारख्या शहरात इण्टरनॅशनल ब्रॅण्ड्सचं प्रस्थ वाढू लागलंय आणि त्याबरोबर नव्या फॅशनचंही. याआधी
आपल्या इथल्या फॅशन डिझायनर्सनी गुलाबी रंगात पुरुषांचं कलेक्शन डिझाइन केलं होतं पण ठराविक रंगांचे शर्ट्स आणि पॅण्ट्स घालणाऱ्यांना ते पसंत पडलं नव्हतं. पुरुषांच्या कलेक्शनमध्ये आता मोठ्या प्रमाणात गुलाबी रंगाचा वापर होऊ लागलाय. गुलाबी रंगातल्या गडद-फिकट छटांमध्ये शर्ट्स, कुतेर्, झब्बे डिझाइन करण्यात फॅशन डिझायनर्सने पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच एकंदरच फॅशनच्या दुनियेत गुलाबी रंग सध्या रॉकिंग आहे. गुलाबी रंगांचा वापर असलेल्या मेन्स आउटफिट्सचा फॅशन शो नुकताच एका सप्ततारांकित हॉटेलमध्ये पार पडला. गुलाबी रंगाच्या कपड्यांना पुरुष वर्गाने पसंतीची पावती दिली असल्याचा प्रत्यय या फॅशन शोमध्ये आला. बॉलिवूडमधील अनेक स्टार यात सहभागी झाले होते. जी फॅशन रॅम्पवर येते ती माकेर्टमध्ये यायला आपल्याकडे वेळ लागत नाही. त्यात सैफ अली, हृतिक रोशनसारखे बॉलिवूड स्टार्स पिंक रंगाला प्राधान्य देऊ लागल्याने सर्वसामान्यांनाचीही आवड बदलायला लागलीय. पिंक रंग जरी गलिर्श वाटला तरी पुरुषांच्या स्टाइल्सनुसार डिझाइन करता येऊ शकतो, असं फॅशन डिझायनर्सचं म्हणणं आहे.
' पिंक इज अ क्लासिक कलर अॅण्ड वी लव टू वेअर इट' असं या स्टार मंडळींचं म्हणणं आहे. मात्र पिंक प्रिण्ट्सना फारशी पसंती नाहीये. प्लेन पिंक रंग पसंतीस उतरतोय. रॅम्प आणि शोरूम्समधून आता ही फॅशन लवकरच सर्वत्र पसरेल आणि 'मेन इन ब्लॅक' ऐवजी 'मेन इन पिंक' असं म्हणावं लागेल.
......
'टाइमली' फॅशन

ट्रेंण्डी लुक येण्यासाठी फॅशनवेड्या तरुणी सध्या मोठ्या डायलच्या आणि रुंद बेल्ट असलेल्या रिस्टवॉचना पसंती देत आहेत. बारीक लेदर बेल्टच्या, छोट्या, छोट्या गोल्डन चेनच्या नाजूक डायलच्या घड्याळांची फॅशन सध्या "आउट' आहे. मोठ्या डायलचे आणि रुंद बेल्टअसलेले फॅशनेबल घड्याळ वापरणाऱ्या नव्याजमान्यातील युवतींच्या म्हणण्यानुसार, अशी घड्याळं आत्मविश्वास वाढवतात आणि व्यक्तिमत्त्व चांगल्याप्रकारे खुलवतात.
अलीकडच्या काळात घड्याळ हे केवळ वेळ सांगणारं साधन राहिलं नसून, फॅशनविश्वात स्थान मिळवलेली ती एक महत्त्वाची ऍक्सेसरी बनली आहे. कपडे, शूज, बेल्ट्स याचबरोबर घड्याळांनाही तेवढंच महत्त्व आहे. घड्याळांच्या एखाद्या शोरूमला भेट दिली तर नाना डिझाइन्सची ट्रेंडी वॉचेस आपलं लक्ष वेधून घेतील. स्त्रियांप्रमाणेच पुरुषांच्या घड्याळांमध्येही वैविध्य आहे. आजकालच्या तरुणींची आवडही थोडी थोडी तरुणांसारखी होत चालली आहे. मग ती आवड स्पोटर्स शूजची असो, लेदर जॅकेटची असो किंवा मोठ्या आकाराच्या फॅशनेबल रिस्ट वॉचची असो. या वस्तूबाबत त्या नवनवे प्रयोग करताना मागेपुढे पाहत नाहीत. कारण सध्याचा जमानाच फॅशनचा आहे आणि अशा परिस्थितीत जो तरुण फॅशनबरोबर चालणार नाही तो "आउटडेटेड' म्हटला जाईल. स्टाइलिश, स्मार्ट आणि फॅशनेबल दिसण्यासाठी आजकाल तरुणीदेखील ड्रेसअप आणि लुकमध्ये बदल करण्यास उपयुक्त ठरणारे सर्व फंडे आजमावून बघते. ट्रेंण्डी लुक येण्यासाठी फॅशनवेड्या तरुणी सध्या मोठ्या डायलचे आणि रुंद बेल्ट असलेल्या रिस्ट वॉचना पसंती देत आहेत. बारीक लेदर बेल्टच्या, छोट्या छोट्या गोल्डन चेनच्या नाजूक डायलच्या घड्याळांची फॅशन सध्या "आउट' आहे. मोठ्या डायलचे आणि रुंद पट्ट्याचे बेल्ट असलेले फॅशनेबल घड्याळ वापरणाऱ्या नव्या जमान्यातील युवतींच्या म्हणण्यानुसार, अशी घड्याळं आत्मविश्वास वाढवतात आणि व्यक्तिमत्त्व चांगल्याप्रकारे खुलवतात. शिवाय असं घड्याळ जीन्सप्रमाणेच साडीवरही शोभून दिसतं. म्हणूनच आजकालच्या नोकरदार तरुणींची पहिली पसंती मोठ्या डायलच्या, रुंद बेल्टच्या घड्याळांना आहे. बऱ्याच नामवंत घड्याळ कंपन्यांनीदेखील आता खास तरुणींसाठी स्पोर्टी आणि ट्रेण्डी लुकची घड्याळं तयार केली आहेत. खास करून त्यांच्या नाजूक मनगटावर ही घड्याळं खूप शोभून दिसतात.
ही घड्याळं ब्लॅक आणि ब्राऊन या रंगांबरोबरच इतर अनेक वेगवेगळ्या आकर्षक रंगांतही उपलब्ध आहेत. यांचे बेल्टही खूप आकर्षक असतात. तुम्हाला थोडंसं हटके काहीतरी घालायचं असल्यास चेरी, रेड, व्हाइट, स्कायब्ल्यू रंगाचं रिस्ट वॉच जरूर ट्राय करावं. असं घड्याळ तुम्हाला गर्दीतही जरा हटके आणि ट्रेण्डी लुक देईल. तसेच आवड असल्यास आठवड्याच्या सात दिवसांसाठी ड्रेसवर मॅच होईल. अशी वेगवेगळ्या रंगांची घड्याळं घालून काही नवं ट्राय करू शकता. ऑफिसमध्ये तुमच्या लुकमुळे तुमची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. सोमवारी गुलाबी, बुधवारी लाल, शनिवारी ब्लॅक असे रंग ट्राय करण्याचा पर्याय आहे.
कुठलीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी तिची किंमत, तिचा उपयोग यावर अधिक लक्ष द्यावं. उदा. तुम्हाला रोज वेगवेगळ्या रंगांची घड्याळं घालणं पसंत असेल तर तुम्ही ब्रॅण्डेड ऐवजी लोकल कंपन्यांची फॅशनेबल घड्याळं घ्यावीत. आजकाल कंपन्यादेखील कित्येक ब्रॅण्डेड महाग घड्याळांची डुप्लिकेट घड्याळं बनवत आहेत. अर्थात ब्रॅण्डेड घड्याळांची सेम डुप्लिकेट कॉपी असणारी घड्याळं तुम्ही खरेदी करू शकता. तुमच्या बजेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची घड्याळं घालून तुम्ही तुमची आवड पूर्ण करू शकता. तसंच फॅशनच्या बदलत्या ट्रेण्डनुसार नवी घड्याळं खरेदी करू शकता. परंतु तुम्ही वर्षानुवर्षे केवळ एक किंवा दोनच घड्याळं खरेदी करणार असाल तर, ब्रॅण्डेड घड्याळं हाच एक चांगला पर्याय आहे.
लोकल कंपन्यांची फॅशनेबल घड्याळं तुम्हाला 150 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत सहज मिळतात. तर ब्रॅण्डेड घड्याळांसाठी 1200 ते 5000 रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. आता किती पैसे खर्च करायचे, हे शेवटी तुमच्यावर अवलंबून आहे.
......
मराठी कॅलिग्राफीतील ‘टी-शर्ट’ |
माझा मराठीची बोलु कौतुके किंवा माझा मराठीचा बोल .... काळजात खोल पाझरे ..... अमृताची ओळ या ज्ञानेश्वर माऊलींच्या ओळी, ‘प्रतिपच्चंद्र लेखेव’ ही छत्रपती शिवाजींची राजमुद्रा, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘ने मजसी ने..’ या काव्यपंक्तींसह कुसुमाग्रजांच्या ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ यासह पाडगावकरांच्या ‘सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत की गाणं म्हणत’ या काव्यपंक्ती सुरेख कॅलिग्राफीत तुमच्या टी-शर्टवर उमटल्या तर नक्कीच तुम्ही तो टी-शर्ट घालून मित्रांमध्ये मिरवाल. अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मराठीच्या काव्यपंक्ती सार्थ अभिमानाने आपल्या अंगावर मिरविण्याची संधी आता पुणेकरांना भारतीय वस्त्र शिल्प या ठाणेस्थित कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. पुण्यातील प्रमुख वितरक सिल्व्हर लाईनचे दीपक व नूतन सोमवंशी यांनी या टी-शर्ट्सचे दालनच साहित्य संमेलनाच्या प्रदर्शनात मांडले आहे. सोमवंशी ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, मराठीतील श्रेष्ठ कवींच्या काव्यपंक्ती या टी-शर्टवर अच्युत पालव, यजुवेंद्र, पिनाकिन रिसबूड आदी नामवंत सुलेखनकारांनी (कॅलिग्राफर्स) आपल्या सुंदर अक्षराने रेखाटल्या आहेत. हाय डेन्सिटी प्रिंटिंगमुळे प्रिंटचा दर्जा उत्तम आहे. सर्वोत्तम काव्यपंक्ती, उत्तम डिझाईन, आकर्षक रंगसंगती व चार साईजेस ही या टी-शर्टची वैशिष्टय़े आहेत. मराठी साहित्याचा मानबिंदू असलेल्या साहित्य संमेलनानिमित्त या संमेलनातील दालनात फक्त २९५ रुपये या माफक किमतीत हे टी-शर्ट्स उपलब्ध करून दिले असून, तीन टी-शर्ट घेणाऱ्यांना एक मराठी दिनदर्शिका मोफत देणार असल्याचे सोमवंशी म्हणाले. शिवछत्रपतींची राजमुद्रा, पाडगावकरांच्या काव्यपंक्ती, साहित्यिकांची नावे, माऊलींच्या ओव्या या कॅलिग्राफी असलेल्या टी-शर्ट्सला सर्वाधिक मागणी असून, विंदा करंदीकर यांच्या काव्यपंक्ती, पसायदानाच्या ओळी, आयुष्यावर बोलू काही यासाठी प्रचंड मागणी आल्याने आम्ही लवकरच तसे टी-शर्ट्स उपलब्ध करून देऊ, असे सोमवंशी म्हणाले. या टी-शर्ट्सवर पाडगावकरांची ‘विश्वास ठेवा यात काही पाप नाही’, ‘या जन्मावर या जगण्यावर’ यासह ‘एक रात चांदण्यात अन् मिठीत मोगरा’, ‘अभिमान आहे मला मी मराठी असण्याचा’, ‘माझं काय तुमचं काय प्रेमात पडलं की असंच व्हायचं’, ‘हा छंद जिवाला लावी पिसे’, ‘त्यानं प्रेम केलं तिनं प्रेम केलं’, ‘तिची का रंगते मेंदी’ यासारख्या ३०-४० काव्यपंक्ती उपलब्ध आहेत. तर मग मराठी प्रेमींनो मिरवणार ना मराठी कॅलीग्राफीचे टी-शर्ट्स घालून! ...... स्टायलिश जॅकेटस् थंडीच्या दिवसांत काही फॅशन्स पुनःपुन्हा येतात. कोट आणि जॅकेट अशी फॅशन आहे की बरेच जण आपल्या स्टाईल स्टेटमेंटमध्ये त्याचा अंतर्भाव करतात. कपडे वेस्टर्न असोत की इंडियन, त्यावर जॅकेट किंवा कोट चांगला दिसतो. जॅकेटमध्ये खूप वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. क्लासिक सूट जॅकेट घालून तुम्ही ऑफिसला जाऊ शकता. एक एलिगंट लूक तुम्हाला यामुळे मिळतो. गडद रंगाची सूट जॅकेटस् फॉर्मल लूक देतात. स्पोर्टस् जॅकेट घालण्याची तरुणांमध्ये क्रेझ आहे. डेनिम, कॉड्राय, ज्यूट फॅब्रिकपासून बनवलेली जॅकेटस् एकदम कूल लूक देतात. अशा जॅकेटस्वर एम्ब्रॉयडरी, सिक्वेन्स वर्क केले जाते. जेणेकरून ही जॅकेटस् तुम्ही पार्टीतदेखील घालू शकता. तरुणींसाठी भारतीय पोशाखासोबत शाल जॅकेट आहे. अनेक सुंदर डिझाइन्समध्ये आणि रंगात शाल जॅकेटस् आहेत. अगदी लग्न समारंभातदेखील तुम्ही शाल जॅकेट घालू शकता. साडीवर परिधान करण्यासाठी ट्रेन्डी ब्लाऊज जॅकेटस् आहेत. जॅकेटची ही दुनिया सर्व वयोगटातल्या लोकांसाठी सज्ज आहे. तुमच्या साध्या जॅकेटला तुम्ही स्पेशल लूक देऊ शकता. एखादा ब्रूच, मेटल स्टड लावून नव्या रूपात सजवू शकता. ...... नऊवारी राजा रविवर्मा यांच्या चित्रातील नऊवारी साडी नेसलेली राणी दमयंती लग्न किंवा इतर समारंभांत सोज्वळ रूप खुलतं ते फक्त नऊवारीतच आणि सध्या वधूच्या कलेक्शनमध्ये हाच ट्रेंड दिसून येतो. वेगवेगळ्या समारंभांत अगदी सहजतेने ही साडी नेसता यावी आणि वावरता यावे, यासाठी त्या शिवून देण्याचे प्रमाणही वाढले आहे. ठुशी, नथ, अंबाडा, कुड्या, पाटल्या, बांगड्या या साजेशा सर्वांगपूर्ण शृंगारासह नऊवारीतील रूप खूप लोभसवाणं दिसतं. म्हणूनच "जुनं ते सोनं' असण्याची प्रचिती या ठिकाणी नक्कीच येते. काळानुरूप फॅशन बदलत जाते. जुन्या फॅशन पुन्हा नवीन रूपातही येतात. अशीच सध्या अगदी लोकप्रिय असलेली म्हणजे नऊवारी साडी. अर्थात नऊवारीला काही "फॅशन' म्हणता येणार नाही. पण रोजच्या पठडीतून जरा हट के केलं की झालीच ना फॅशन. सध्या बहुतेक लग्नसमारंभांचे निरीक्षण केल्यावर लक्षात येईल की, वधूच्या कलेक्शनमध्ये ट्रेंड आहे तो "नऊवारी'चा. लग्नात किमान शास्त्रीय, धार्मिक विधींसाठी तरी नऊवारीचा साज चढतोच. मग ती पैठणी, राजमाता, जिजामाता यापैकी कोणत्याही प्रकारातली असो. आठ-दहा वर्षांपूर्वी शरारा, लाछा या प्रकारांची लग्नसमारंभात फॅशन होती. न्यू जनरेशनमधील मुलींना नऊवारी कशी नेसायची हे माहीत नसले तरी त्यावर खूप सोपा उपाय आहे. कारण "रेडिमेड नऊवारी' अगदी सहज उपलब्ध होत आहेत. आपल्या आवडीची साडी देऊन हव्या त्या प्रकाराची नऊवारी साडी शिवून मिळते. त्यामुळे ही शिवून मिळालेली साडी नेसणे अगदीच सोईचे आणि सोपे. नऊवारीला मागणी असण्याचे कारण म्हणजे ती नेसल्यावर येणारा डिसेंट लुक. मोठ्या काठा-पदराची नऊवारी, पारंपरिक दागिने, नथ, अंबाडा किंवा खोपा, त्यावर मोगरा-अबोलीचा गजरा हे रूप खूपच लोभसवाणे दिसते. या मराठमोळ्या रूपात आपण नटावे, सजावे, चारचौघांनी कौतुक करावं अशी प्रत्येकच मुलीची अपेक्षा असते. त्यामुळे आय.टी.मध्ये काम करणारी मुलगी असो वा अन्य कोणत्याही क्षेत्रातली.. रोजच्या जीन्स, ट्राऊझर, पंजाबी ड्रेस या लुकमधून आपण किती वेगळे आणि आकर्षक दिसू शकतो, यासाठी हा पेहराव अगदी आवर्जून वापरला जातोच. नऊवारी साडीमध्ये अनेक प्रकार आहेत. यापैकी पेशवाई नऊवारीला अधिक मागणी असते. या साडीला ओचा असतो. त्यामुळे तिला पेशवाई पद्धतीची नऊवारी म्हणतात. याखेरीज मराठमोळी नऊवारीला कोल्हापूर आणि परिसरात जास्त मागणी असते. या साडीला काष्टा असतो. ओचा ठेवला जात नाही. अलीकडे कॉलेजच्या डान्स कॉम्पिटिशन्समधून किंवा इतर कल्चरल इव्हेंटसाठी लावणी सादर केली जाते. त्यासाठी लागणारी लावणीची नऊवारी देखील झटपट शिवून मिळू शकते. पैठणीबरोबरच सेमी पैठणी, बेळगाव सिल्क, येवला पैठणी या साड्यांमध्ये नऊवारी शिवून घेतल्यास खूप मस्त लुक येतो. रेडिमेड नऊवारीसाठी साडी निवडताना देखील डार्क आणि रिच कलर घ्यावेत; म्हणजे ती साडी खूप उठून दिसते. सध्या मॅजेंटा, पिवळा, हिरवा या रंगांना विशेष मागणी आहे. या रंगांच्या साड्यांना कॉंट्रास्ट रंगाचे काठ वापरावेत म्हणजे साडीचा लुक जास्त रिच दिसतो. मॅजेंटा रंगाच्या साडीला शक्यतो जांभळे काठ, पिवळ्या साडीला हिरवे किंवा लाल काठ, हिरव्या साडीला मरून रंगाचे काठ छान दिसतात. रेडिमेड नऊवारी साडी ही नेसायला, वावरायला खूपच कम्फर्टेबल असल्यामुळे याची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे नऊवारी साडी शिवणाऱ्या सुचेता कुलकर्णी यांनी सांगितले. रेडिमेड नऊवारीसाठी साडी निवडताना डार्क आणि रिच कलर घ्यावेत.नऊवारीला मागणी असण्याचे कारण म्हणजे ती नेसल्यावर येणारा डिसेंट लुक. रेडिमेड नऊवारी साडी ही नेसायला, वावरायला खूपच कम्फर्टेबल आहे. |