Friday, July 16, 2010

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी:सुरेश भट

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी ,
एवढ्या जगात माय मानतो मराठी
.....
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
.....
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या नहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
.....
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
.....
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
.....
येथल्या नभामधऊन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
.....
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असेच कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी


भारतातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी भारतातील चौथी भाषा आहे. मराठी बोलणारयांची एकूण लोकसंख्या ,००,००,००० आहे. मराठी भाषा १३०० वर्षांपासून प्रचलित आहे.मराठी भाषा भारतासह मॉरीशस इस्त्राएल या देशातही बोलली जाते.त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या महाराष्ट्रीय भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया न्युझीलंड येथेही बोलली जाते.

भारतात मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू छत्तीसगढ राज्यात आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या प्रदेशातील काही भागात मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- बडोदा, सुरत, दक्षिण गुजरात अहमदाबाद (गुजरात राज्य), बेळगांव, हुबळी- धारवाड, गुलबर्गा, बिदर, उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), हैद्राबाद (आंध्र प्रदेश), इंदूर, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) तंजावर (तामिळनाडू)भारताचे संविधानातील २२अनूसुचित (अधिकृत) भाषेच्या सुचीत मराठीचा समावेश आहे.मराठी, महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात दमण आणि दीव,दादरा नगर हवेली या केंदशासीत प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.मराठी भाषा महाराष्ट्र गोवा राज्याची राजभाषा असून सुमारे कोटी लोकांची आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय संविधानाने मराठीला इतर २२भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे.

मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा संस्कृतीची भरभराट झाली. शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाचीरचना मराठी भाषेत केली. त्यानंतर शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. या नंतरमहानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तीपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. .. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. .. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचामुकुट प्राप्त झाला. .. १९३० पासून मराठी साहित्य संमेलन सुरु झाले. मराठी साहित्यिकांनी १९९०च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला.‍ ‍

श्रावणबेळगोळ येथील सर्वात जुना मराठी शिलालेख
सर्वात जुना मराठी लेखनाचा पुरावा सातारा येथेविजयादित्य-काळातील ताम्रपट्टीवर आहे (. . ७३९) येथे आहे. श्रावणबेळगोळ, कर्नाटक येथे सर्वात मराठी शिलालेख आहे. हा शिलालेखात राजा गंगराय त्याचा सेनापती चामुंडराय यांचे उल्लेख आहेत.मराठीभाषेचे वय हे साधारण पणे 1500 वर्ष मानले जाते. याकाळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा बदलत राहिली असे मानले जाते.